कोल्हापूर दिनांक 3 – महाराष्ट्रात आता महायुतीचे सरकार स्थापन होणार असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे.त्यानुषंगाने मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.तसेच बरेचजण देव पाण्यात घालून बसले आहेत.त्यातच केंद्रीय नेतृत्व असणारे अमित शहा यांनी मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वी आमदारांचे आणि माजी मंत्र्यांचे रेकॉर्ड मागविले असून त्याची तपासणी करून प्राधान्यक्रम ठरविला जाणार असल्याचे दिसते.या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
त्या अनुषंगाने लवकरच विविध महामंडळे, समित्या अशा ठिकाणी सुध्दा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार असल्याचे दिसते.त्यामुळे मंत्रिपदा साठी जसे रेकॉर्ड मागविले आहे तसेच महामंडळा सारख्या ठिकाणी नेमणूक करण्यापूर्वी नेतृत्वाने कार्यकर्त्यांची यापूर्वीचे रेकॉर्ड तपासूनच योग्य निष्कलंक,भ्रष्टाचाराचे आरोप न झालेल्या नवीन चेहऱ्यांना संधी दिली जावी अशी मागणी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेकडून मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यानुषंगाने नेतेमंडळी काय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.