कोल्हापूर दिनांक 19 -l गुन्ह्यातील वाहन सोडविण्यासाठी म्हणणे देण्यासाठी लाचेची मागणी केल्याबद्दल गांधीनगर पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस निरीक्षक आणि एक कॉन्स्टेबल यांच्यावर लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आहे.तक्रारदार व त्यांचा मित्र जनावरे वाहतुकीचा व्यवसाय करीत असुन सदर गुन्हयात तक्रारदार यांचा आयशर टॅम्पो जप्त आहे. तक्रारदार हे त्यांचा जप्त केलेला टॅम्पो सोडविणेकरीता कोर्टात म्हणणे देणेकरीता गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगीरे यांना दिनांक २५/११/२०२४ रोजी भेटले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडे म्हणणे देणेकरीता ‘ ३०,००० /- रुपयांची मागणी केली. तसेच तक्रारदार यांचे पार्टनर यांना दिनांक २५/११/२०२४ रोजी गांधीनगर पोलीस ठाणे येथील सहायक पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी फोन करून तक्रारदार यांना गुन्हयात मदत करतो यासाठी तक्रारदार यांचे मित्राकडे ३५,०००/- रुपयांची मागणी केली होती म्हणुन तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे दिलेल्या तक्रार अर्जामध्ये पडताळणी केली असता त्यामध्ये तक्रारदार यांचेवर दाखल असलेल्या गुन्हयामध्ये मदत करणेसाठी व गुन्हयामध्ये जप्त असलेला टॅम्पो सोडविण्याकरीता मा. न्यायालयात म्हणणे देणेसाठी गुन्हयाचे तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक शिरगिरे यांनी तक्रारदार यांना फोनवर पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेण्यास सांगितले त्याप्रमाणे तक्रारदार यांनी पोलीस कर्मचारी कांबळे यांची भेट घेतली असता पोलीस कर्मचारी कांबळे यांनी शिरगिरे साहेब यांना तक्रारदार यांचे समक्ष फोन केला व दुर्गेश आला आहे त्याला सांगितले का असे शिरगिरे साहेब यांना सांगितले असता त्यांच्यात बोलणे झाले नंतर पोलीस कांबळे यांनी शिरगिरे साहेब यांचे सांगणेवरून तक्रारदार यांचेकडे २०,०००/- रू व त्यानंतर तडजोड करून १५०००/- रुपये शिरगिरे साहेब यांचेकरीता मागणी केली आहे. तसेच सहा. पोलीस निरीक्षक दिपक जाधव यांनी तक्रारदार हे अटकेत असताना सदर गुन्हयामध्ये मदत करणेकरीता तक्रारदार यांचे पार्टनर यांचेकडुन यापुर्वी पैसे घेतलेची कबुली देवुन गुन्हयात मदत करतो याकरीता उर्वरीत राहिलेले ३५०००/- रूपयांची तक्रारदार व त्यांचे पार्टनर’ यांचेकडे मागणी केली तसेच गाडी सोडणेचे म्हणणे देणेकरीता शिरगिरे साहेबांना १०,०००/- रूपये दया असे म्हणुन शिरगिरे साहेबांचे करीता मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी दिले तक्रारीवरून आरोपी लोकसेवक १) दिपक शंकर जाधव, वय ४४ वर्षे सहा. पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे, सध्या रा. अर्थव ओंकार कॉप्लेक्स बापट कॅम्प कोल्हापुर, मुळ रा. पेठ किनाई, ता. कोरेगांव, जिल्हा सातारा. २) आबासाहेब तुकाराम शिरगारे, पोलीस उप निरीक्षक सध्या रा. विदुमाउली अपार्टमेन्ट निगडेवाडी उचगांव, ता. करवीर जिल्हा कोल्हापुर मु.पो. उमरगा चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव उस्मानाबाद ३) संतोष बळीराम कांबळे, वय ३३ वर्षे, पो.कॉ.ब.नं. १८२८, गांधीनगर पोलीस ठाणे, रा. शिरोली हौसिंग सोसायटी, माळवाडी, शिरोली, ता. हातकणंगले जिल्हा कोल्हापुर यांचेवर गांधीनगर पोलीस ठाणे येथे दिले फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. सदरची कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपआयुक्त / पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे. श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, पुणे यांचे तसेच वैष्णवी पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. कोल्हापूर मार्गदर्शनानुसार बापू साळुंके, पोलीस निरीक्षक व पथक अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी केली आहे.