तमदलगे येथील रत्यावर पडलेले खड्डे मुजविण्याच्या कामाला सुरुवात…
तमदलगे येथील सांगली कोल्हापूर बायपास रोड मार्गावरील खड्डे लवकरात लवकर मुजवावेत अन्यथा
अखिल भारतीय मूकनायक पत्रकार संघाच्या वतीने तमदलगे येथील सांगली कोल्हापूर
मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा खड्डे का बड्डे करून आंदोलन करणार असल्याचा इशारा रघुनाथ कांबळे यांनी दिला होता,
तमदलगे येथील सांगली कोल्हापूर बायपास रोड मार्गावरील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारक आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करत आहेत. तमदलगे येथील सांगली कोल्हापूर बायपास रोड मार्गावरील खड्ड्यात पडून अनेकांचे बळी गेले आहेत. अनेकांचे अपघात झाले आहेत. हे लक्षात घेऊन मूकनायक पत्रकार संघाचे तमदलगे शहर अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांनी मूकनायक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश विलासराव वाईकर,साहेब यांना भेटून सांगली कोल्हापूर बायपास रोड वरील तमदलगे येथील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सविस्तर चर्चा केली. आणि मूकनायक पत्रकार संघाच्या वतीने तमदलगे येथील सांगली कोल्हापूर
मार्गावर पडलेल्या खड्ड्यांचा खड्डे का बड्डे करून आंदोलन करणार असल्याचा इशारा रघुनाथ कांबळे यांनी दिला होता, आणि या मूकनायक पत्रकार संघाच्या इशाऱ्याची रस्ते व बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन सांगली कोल्हापूर बायपास रोड वरील तमदलगे येथील रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यामुळे वाहनधारक व नागरिकांतून मूकनायक पत्रकार संघाचे व मूकनायक पत्रकार संघाचे तमदलगे शहर अध्यक्ष रघुनाथ कांबळे यांचे कौतुक होत आहे,