कोल्हापूर दिनांक 20 -सहयाद्री व्याघ्र राखीव च्या आंबा वनक्षेत्रात लावण्यात आलेल्या कॅमे-यामध्ये दिसून येते हातामध्ये बंदुक घेऊन शिकारीच्या शोधामध्ये फिरणारा इसम गोविंद बाळू शिंदे रा.केलें पैकी नेर्लेवाडी ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर हा कॅमे-यामध्ये कैद झाला. वनरक्षक रोहिदास पडवळे हे नेमुण दिलेल्या कामानुसार लावण्यात आलेल्या कॅमे-यांची तपासणी कामी गेले असता मौजे केलें जंगल कक्ष क्रमांक १०२९ मधील कॅमे-यामध्ये वरील आरोपीचे बंदुकीसह फिरतानाचे ०३ फोटो मिळून आले. सदरची बाब त्यांनी आपले वरीष्ठ यांना कळविलेनुसार पंचासह वनक्षेत्रात कॅमेरा लावलेल्या ठिकाणी जावून कॅमे-याची तपासणी करून मेमरी कार्ड जप्त करण्यात आले. व कार्डमधील आरोपीचे फोटो प्रिंट करण्यात आले.
गोपनीय तपासानुसार आरोपीला धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन घरझडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातून एअर गण मिलीटरी कलरचे जॅकेट, मोबाईल, दोन दोन सिमकार्ड सह मुददेमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त करणेत आला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक चांदोली अमित भिसे यांनी आरोपीची समक्ष चौकशी करून जबाब नोंदविला व साक्षीदारांचे तपास टिपण तयार केले. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शाहूवाडी यांचे न्यायालयात हजर केले असता दोन दिवासांची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्यातील आणखीन आरोपीचा सहभाग असलेचे समोर येत आहे.
गुन्हाचा तपास एम. रामानुजम, क्षेत्र संचालक सहयाद्री व्याघ्र राखीव स्नेहलता पाटील,सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे , प्रदिप कोकीतकर वनपाल सागर पोवार , वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई वनपाल , वनरक्षक रोहीदास पडवळे, अरविंद पाटील, विशाल पाटील, राजेद्र बनकर तपास करत आहेत,सहयाद्री व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आलेले असून नागरीकांनी कोणत्याही कारणास्तव सहयाद्री व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये विना परवाना अपप्रवेश करू नये असे जाहीर आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी (आंबा) प्रदिप कोकीतकर यांनी केले आहे.