कोल्हापूर दिनांक 29 महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीने इचलकरंजी विधानसभा निवडणूक 2024 साठी प्रा. सचिन बेलेकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आजच्या तरुणांचे प्रश्न, रोजगार, पाण्याचा प्रश्न, इचलकरंजीतील यंत्रमाग कामगार, वीज सवलत, रोबोटीक्स तंत्र, वाहतुकीची समस्या, सर्व शिधा पत्रिका धारकांना धान्य पुरवठा यासारखे व्हिजन घेऊन सर्व सामान्य मतदार म्हणून आज निवडणुकीत भाग घेतला आहे. एक पत्रकार ते शिक्षक काय बदल घडवू शकतो, मतदार बंधूनी संधी दिली तर नक्कीच कायापालट करीन अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सर्व सामान्य जनतेच्या विश्वासवर कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, हे विकासाचे ध्येय घेऊन येत आहेत.