कोल्हापूर दिनांक 27 – कोल्हापूर उत्तरच्या ताणलेल्या निर्णयाला राजेश लाटकर यांच्या उमेदवारीने पूर्णविराम मिळाला आहे.परंतु असे असले तरी कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते नाराज असल्याचे चित्र दिसत असून त्यातूनच काल काँग्रेस कमिटीवर अज्ञातांनी दगडफेक केल्याचे समजते.तरी महाविकास आघाडीच्या या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.त्यामुळे एवढी उलथापालथ होऊन राजेश लाटकर यांनी उमेदवारी महाविकास च्या घटक पक्षांना रूचलेली दिसत नाही.आता हे सर्वजण काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असले तरी सध्य स्थितीला महायुतीने राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यास महायुती कोल्हापूरचा डाव जिंकू शकते.