अनिल घाटगे
पूणे – मंत्रालयातील बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे शिक्षकेतर कर्मचारी प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा व ग्रंथालय परिचर या पदाच्या वेतन निश्चिती येथील विसंगती दूर करावे व जीआर प्रमाणे परिपत्रक काढावे आणि सर्व विभागांमध्ये एकसारखी वेतन निश्चिती व्हावी अशा पद्धतीच्या ठरलेल्या बैठकीतील निर्णयाला संचालक पुणे ऑफिस यांनी वाटाण्याच्या अक्षदा लावले आहेत व चुकीच्या पद्धतीचे परिपत्रक काढले आहेत ते त्वरित रद्द करावे आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे परिपत्रक त्वरित संघटनेला अदा करावे यासाठी महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी डॉक्टर आर बी सिंग यांच्या नेतृत्वाखाली व महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ बडे अमरावती उपस्थितीत पुणे संचालक ऑफिसच्या दारात एक दिवसाचा धरणे कार्यक्रम सुरू असून पाच पर्यंत योग्य तो निर्णय न दिल्यास 29 ऑगस्ट पासून मुदत कॉलेज बंद आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा सिंग साहेबांनी केली आहे महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून आज संघटनेचे पदाधिकारी विभागीय अध्यक्ष सेक्रेटरी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते
कार्याध्यक्ष शशिकांत कामटे कार्याध्यक्ष गोविंद जोशी महाविद्यालयीन शिवाजी विद्यापीठाच्या कर्मचारी संघटनेचे चंद्रकांत धनवडे अशोक जाधव, पांडुरंग चौगुले श्री रवी भोसले उद्धव भोसले डी एम कोरडे सुतार सर विलास भोसले जयंत कदम अनिल सुतार हे सांगली सातारा कोल्हापूर विभागातून उपस्थित होते महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून दोनशे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महासंघाचे उपाध्यक्ष अनिल घाटगे चंद्र पांडे राजाभाऊ बडे शशिकांत कामटे दिलीप पवार गोविंद जोशी इत्यादींचे मार्गदर्शन लाभले यावेळी बोलताना डॉक्टर आर बी सिंग यांनी सरकारला व संचालकांना निर्वाणीचा इशारा दिला आम्हाला कोणाच्या विरोधामध्ये लढायचे नाही आमची ही हक्काची लढाई आहे आम्हाला न्याय मिळवून कर्मचाऱ्यांच्या हक्काचे कर्मचाऱ्यांना मिळालेच पाहिजे असे संचालकांना ठणकावून सांगितले अन्यथा मला ते मुदत कॉलेज बंदची हाक द्यावी लागेल तरी त्वरित परिपत्रक देऊन सहकार्य करावे असे सांगितले.अशी माहिती अनिल घाटगे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ कल्याण मुंबई यांनी दिली आहे.