कोल्हापूर दिनांक 16 – जुना बुधवार पेठ येथील सिटी सर्वे नंबर 2384 या जागेत राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याच्या मालकीचे सुमारे 40 वर्षांपूर्वीचे बांधकाम धोकादायक परिस्थितीत होते.सदरचे बांधकाम कित्येकवर्षे विनावापर असून तिथे साप ,मुंगूस यांचे वास्तव्य असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या कुटुंबांना धोका निर्माण झाला होता.त्याअनुषंगाने कोमनपा ने सदरचे बांधकाम उतरवून घेण्याबाबत राजेंद्र मोहिते याला नोटीस बजावली होती तरीसुद्धा आडमुठेपणा व इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने मोहिते याने महानगरपालिकेला वकिलामार्फत नोटीसीने सदरची जागा वापरत असल्याचे आणि धोकादायक नसल्याचे कळवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता.तसेच कोमनपा कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास तो मज्जाव करत होता.त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.त्याअनुषंगाने दिनांक 13 रोजी महापलिकेचे कर्मचारी कारवाई साठी आले असता पोलीस बंदोबस्त मागविल्याचे मोहिते याला समजताच त्याची भीतीने गाळण उडाल्याने तो पळून गेला आणि कारवाई करण्यास त्याने कोणताही अटकाव केला नाही.त्यामुळे उर्मट मोहिते याला महानगरपलिकेच्या अधिकाऱ्यांनी अद्दल घडवून धोकादायक बांधकाम पाडून आजूबाजूच्या नागरिकांचे रक्षण केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू असल्याचे समजते.