कोल्हापूर दिनांक 22-डी मार्ट ताराबाई पार्क कोल्हापूर मध्ये केलोग्ज अळ्या सापडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले शहराध्यक्ष प्रसाद पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत व मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी डी मार्ट वरती हल्लाबोल केला. अन्न व औषध प्रशासनाच्या शिंगटे व कदम या अधिकाऱ्यांसह बुरशीचं अळ्या सापडलेला केलॉग्ज खायला घालून मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचा जाहीर निषेध केला. पोलिसांचा प्रचंड फौंज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रचंड पोलीस फोज फाटा तैनात करण्यात आला होता.
यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडून मनसेच्या दणक्याने आदेश देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी डी मार्ट मधील विक्री बंद करावयास लावली व अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची प्रक्रिया राबवण्यात आली. डी मार्ट विक्री बंद करून अन्न व औषध प्रशासनाने त्यांच्यावरती खटला दाखल केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरी शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला आवाहन केले की कोल्हापुरातील जनतेने इथून पुढे डी मार्ट मध्ये खरेदी करू नये. बॅन डी मार्ट ही मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात यावी. इथून पुढे डी मार्ट वरती कायमस्वरूपी बंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकतीने तीव्र लढा उभा करेल असे सांगण्यात आले.