कोल्हापूर दिनांक 18-दि.14/07/2024 रोजी विशाळगड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभुमीवर निषेध व्यक्त करणेसाठी | AIMIM चे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दि. 19/07/2024 रोजी कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात दुपारी | 03.00 वा जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच तहसिल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्रातील AIMIM | चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले बाबतची माहिती वृत्त पत्राव्दारे व सोशल मिडीयाव्दारे कोल्हापूर पोलीस प्रशासनास प्राप्त झाली असून माजी खासदार इम्तियाज जलील हे दि.19/07/2024 रोजी कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार आहेत असे विविध माध्यमाव्दारे देखील माहिती प्राप्त झाली आहे.विशाळगड प्रकरणात खासदार जलील यांनी छत्रपती घराण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने वाद वाढून त्यांच्या दौऱ्याला विरोध होत होता आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार अशी स्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे वरील प्राप्त माहितीच्या आधारे कोल्हापूर पोलीस प्रशासनाने दि. 17/07/2024 रोजी माजी खासदार | इम्तियाज जलील यांना फोनव्दारे संपर्क साधला असता त्यांनी कळवले की, दि. 19/07/2024 रोजी ते कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार नाहीत.तसेच कोल्हापूर जिल्हयातील विविध हिंदूत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी माजी खासदार इम्तियाज | जलील यांच्या दि. 19/07/2024 रोजी कोल्हापूर जिल्हा दौ-याला तिव्र विरोध दर्शवून जर माजी खासदार इम्तियाज जलील हे कोल्हापूर जिल्हा दौ-यावर आलेवर कोल्हापूर बंद करणेत येईल असे जाहिर केले होते.विविध संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोल्हापूर जिल्हयातील सर्व नागरिकांनी कळविणेत येते की, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी कळविले वरुन ते कोल्हापूर जिल्हा दौ-यावर येणार नाहीत. आपण सर्वांनी शांतता राखावी, सामाजिक सलोखा ठेवावा असे कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे वतीने आवाहन करण्यात येत आहे.कोल्हापूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करणेत येते की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, | सामाजिक शांतता भंग होईल अशा पध्दतीने स्टेटस लावू नये याबाबत मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दि. 17/07/2024 रोजी आदेश काढले आहेत. या आदेशानुसार कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाचे सायबर सेल व्दारे लक्ष ठेवणेत आले असून सोशल मिडीयाव्दारे जातीय तणाव निर्माण होणा- या पोस्ट प्रसारीत केलेस संबधीतावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हा पोलीस प्रशासनाने कळविले आहे.