नाशिक दि १५ : गुणवंंत कामगार कल्याण मंडळ नाशिक शाखा आयोजित परिसंवाद व स्नेहसंमेलन नियोजन मिटिंग कालिका मंदीर नाशिक येथे संपन्न झाली.या मिटिंग साठी राज्य अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण,राज्य सचिव राजेश हजारे पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मोहमंद शरीफ मुलाणी इ.कोअर सदस्य पुण्याहुन खास या मिटिंगसाठी उपस्थित होते,नाशिक शहराध्यक्ष पोपटराव देवरे,सुभाष गिते,प्रशांत कापसे,विलास गोडसे,सौ,संगिता फुके व सर्व नाशिक कार्यकारीणी सदस्य या मिटिंगसाठी उपस्थित होते.स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रुपरेषा सर्वानुमते ठरविण्यात आली व त्या अनुषंगाने कामाच्या जबाबदारीचे नियोजन करणेत आले आहे.मिटिंगच्या शेवटी कालिका सभागृह मध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणेत आली आहे.पुढील बारा दिवसात सर्व सदस्यांनी आपापले योगदान देऊन नाशिक शहर जिल्ह्यातील सर्व गुणवंतांना निमंत्रित करुन स्नेहंसंमेलन यशस्वी करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी केले आहे.