कोल्हापूर दिनांक 13-छत्रपती शिवाजी पुलावर शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व्हावा या मागणीचे निवेदन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना जुना बुधवार तालमी च्या वतीने देण्यात आले ऐतिहासिक पन्हाळा व विशाळगड या किल्यानं जोडणारा रस्ता तसेच जोतिबा देवस्थान आणि तीर्थक्षेत्र अंबाबाई देवीला येणारे हजारो पर्यटक या पुलावरून ये जा करतात तसेच कोकण चा प्रवेशद्वार म्हणून या जोडणाऱ्या पुलाची ओळख आहे त्या मुळे 25 वर्षे जुना बुधवार पेठेची मागणी आहे की हा पुतळा बसवावा या साठी रीतसर दिल्लीतील पुरातत्व विभाग आणि केंद्रीय परवानगी आणि राज्य शासन याचा पाठपुरावा छत्रपती शाहू महाराज यांनी करावा आणि रीतसर परवानगीने हा अश्वारूढ शिवरायांचा पुतळा या बसवावा आशा मागणीचे निवेदन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना देण्यात आले या शिष्टमंडळात मंडळाचे श्री सुशिल भांदिगरे,रणजित शिंदे,धनाजी दिंडे,रमेश पुरेकर,अनिल पाटील,शशिकांत जाधव,बळी चव्हाण,सुभाष चव्हाण,आदित्य केसरकर,शंकर वेरागी,सुनील शिंदे,सुनील आडगुळे,सुनील चव्हाण आदी पेठेतील मोहरम कमिटी उपस्थित होती.