कोल्हापूर शहरातील “पवार गँग ” व “नारळ गँग’ कोल्हापूर जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपार !! कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवा
कोल्हापूर दि 31-कोल्हापूर जिल्हयातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणा-या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटणासाठी गुन्हेगारावर तसेच गुन्हेगारी टोळयांवर एमपीडीए तसेच हद्दपारीची कारवाई करणे बाबत महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिलेले आहेत.
कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हयांना परिणाम देणा-या ” पवार गँग ” या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख १) सुहास उर्फ सोन्या भगवान पोवार व त्याचे टोळीचे सदस्य २) मयुर प्रकाश गवळी ३) प्रकाश मनोहर तौर, ४) उमेश उर्फ गोटया बबन विटेकर सर्व रा.ए.पी. स्कुल कंम्पाऊन्ड कनाननगर कोल्हापूर त्याचप्रमाणे “नारळ गँग’ या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख १) सौरभ उर्फ नारळ दिपक कांबळे, व त्याचे टोळीचे सदस्य २ ) सौरभ राजाराम कांबळे, ३) सिध्देश विनायक कांबळे, ४) ओमकार अजित कांबळे सर्व रा. ७१३ ‘ए’वॉर्ड गंजीमाळ, कोल्हापूर यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनः प्रस्थापित करण्यासाठी, पोलीस निरीक्षक शाहुपूरी पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक जुनाराजवाडा पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी, महेंद्र पंडित सो यांचेकडे सादर केले होते.
पोलीस अधीक्षक, महेंद्र पडिंत यांनी सदरच्या प्रस्तावांची निःपक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणुन उप विभागीय पोलीस अधिकारी जयसिंगपूर विभाग यांची नियुक्ती केली होती. त्यानी चौकशीअंती अहवाल पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर वेळावेळी हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये, त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीने गर्दी मारामारी, जबरी चोरी, खंडणी, गंभीर स्वरुपाची दुखापत, मालमत्तेचे नुकसान करणे इ. अशा प्रकारे माला व शरीरा विरुध्दचे गुन्हयांना परिणाम दिलेला असल्याने, टोळीच्या अशा गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी “पवार गँग” व “नारळ गँग” या टोळींचे प्रमुखासह ८ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एक वर्षाचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले, पारित केलेल्या आदेशाची संबधीत पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ अमंलबजावणी केली.
हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मा. महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.