कोल्हापूर दि 18
येत्या 24 मार्चला महाराष्ट्रात होळी/रंगपंचमी सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने कोरडा दिवस जाहीर केलेल्या महानगरपालिका वगळून यादिवशी एफ एल 2,एफ एल बी आर 2,एफ एल डब्ल्यू 2 या सीलबंद मद्यविक्री अनुज्ञपत्यांची वेळ रात्री 10.30 वरून रात्री 12 वाजेपर्यंत महानगरपालिका क्षेत्रापुरती वाढवून दिली आहे.तसा आदेश महाराष्ट्र शासनाने आयुक्त राज्य उत्पादन शुल्क यांना पत्राद्वारे जारी केला आहे.त्यामुळे पी ले पी ले च्या निर्णयाची खुमासदार चर्चा जनतेत होताना दिसत आहे.