कोल्हापूर दि 5 कोल्हापूर मध्ये तोरसकर चौक येथे असणाऱ्या ग्रामविकास शिक्षण परिषद या शिक्षण संस्थेला निवेदन द्यायला गेलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना पाहून सदर संस्थेचा अध्यक्ष याने संस्था कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढला.
ग्रामविकास शिक्षण परिषद या संस्थेच्या दत्ताजीराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या दीपक गुंडू कांबळे याच्या एम ए आर्टस् ची खोटी डिग्री सादर करून नोकरी मिळवली असल्याच्या संशयाने त्याबाबत संस्थेकडून खुलासा मागणेकामी संघटनेचे कार्यकर्ते निवेदन द्यायला गेल्यावर हा प्रकार घडला.तसेच संस्था चालक राजेंद्र दत्ताजीराव मोहिते पाटील याला फोन लावल्यानंतर त्याने कार्यकर्त्यांना दमदाटी करून मी निवेदन घेणार नाही असा दम भरला.सदरची संस्था शासकीय अनुदानित असून संस्था चालक असा मनमानी कारभार करणार असतील तर शासनाच्या होणाऱ्या फसवणुकीला कोण आळा घालणार असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.यावेळी सुर्यकांत वायदंडे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, रज्जत मुल्लाणी कोल्हापूर शहर अध्यक्ष, नियाज गवंडी कोल्हापूर शहर अध्यक्ष, प्रमोद कुर्ले,कोल्हापूर शहर अध्यक्ष, नितीन सातपुते कोल्हापूर शहर उपाध्यक्ष, आमर शेळके राधानगरी तालुका अध्यक्ष,महादेव कापसे करवीर तालुका उपाध्यक्ष,ऋत्वीक पाटील टेबलाईनाका विभागीय अध्यक्ष,पुजा शिंदे महीला कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष,निकीता माने कोल्हापूर शहर अध्यक्ष आदि उपस्थित होते.