कोल्हापूर दि 4 सायबर महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै.ए.डी.शिंदे यांच्या 14 व्या पुण्यस्मरणानिमित्य सकाळच्या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी जेष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार,सौ.सुधाताई पवार,सौ.वैशाली शिंदे, डॉ.विजयसिंह शिंदे, श्री.निरंजन निंबाळकर,श्री. सुनील शिंदे सायबर चे सचिव व व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.रणजित शिंदे,सी.ए.ऋषिकेश शिंदे,माजी कुलगुरू डॉ. पी.बि.साबळे,डॉ.टि.ए.शिवारे डॉ.व्ही.एम.हिलगे,मौनी विद्यापीठाचे डॉ.पी बी पाटील उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते आनंद ग्रंथ उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये सुमारे 25 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी आपली विविध विषयांवरील पुस्तके सवलतीच्या दरात विक्रीसाठी ठेवली आहेत.कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागामार्फत संजीवन ब्लड बँक सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन सौ.सुधाताई पवार व डॉ. विजयसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यात सुमारे 50 हून अधिक बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले. यासोबतच सायबर महाविद्यालय संचलित महिला महाविद्यालयाच्या विविध विभागांमार्फत व राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल मार्फत विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध उपक्रमांचे प्रदर्शन सोमवार दि. 5/2/2024 पर्यंत सर्वांसाठी मोफत उपलब्ध असून याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन सायबर चे संचालक डॉ. एस. पी. रथ यांनी केले.