कोल्हापूर दि 11
रंकाळा स्टँड परिसरात असणाऱ्या एका हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात जोरात सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.सदर हॉस्पिटल ला अधिकृत मान्यता मिळाली नसताना सुद्धा स्त्रियांच्या डिलिव्हरी केल्या जात असल्याची माहिती मिळाली आहे.मग या प्रकाराला कोणाची साथ आहे?तसेच सदर रुग्णालयातील पत्नी डॉक्टर राजरोसपणे बेकायदेशीर गर्भपात करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.त्यामुळे अश्या प्रकारच्या बेकायदेशीर गर्भपाताचे केंद्र सदरचे हॉस्पिटल बनले असून योग्य पुराव्यानिशी सदर हॉस्पिटल व डॉक्टर तसेच त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांची चौकशी होऊन कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.