कोल्हापूर दि 5:जालना येथील घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात सरकारच्या विरोधात आंदोलने वाढली असून ठिकठिकाणी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.त्याअनुषंगाने कोल्हापूर मध्ये सुद्धा आज बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा समाज आक्रमक झाला असून सरकारने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.तसेच येत्या 10 तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सभा घेण्यासाठी येणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर अजितदादा यांच्या सभेला विरोध वाढत आहे.मराठा समाजाचे संजय पवार यांनी अजितदादा यांच्या गाडीखाली उडी मारण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे वातावरण गंभीर बनले असून सरकारने यावर त्वरित निर्णय घेऊन मराठा समाजाला न्याय देण्याची मागणी होत आहे.