कोल्हापूर दिनांक 23 – कोल्हापूरचे सुपुत्र मनोज पाटील सध्या राहणार मुंबई यांनी दिनांक 22 डिसेंबर रोजी गोरेगाव नेस्को एक्सीबिशन सेंटर येथे आयोजित भारत प्रो शो या Men’s Physique स्पर्धेत भाग घेत सुवर्णपदकाची कमाई केली, आणि या विजयाबरोबरच मनोज पाटील हे आंतरराष्ट्रीय स्पर्धा मिस्टर ओलंपिया या स्पर्धेसाठी पात्र झाले आहेत, ऑक्टोंबर 2025 मध्ये मिस्टर ओलंपिया ही स्पर्धा Las Vegas येथे आयोजित केली जाणार आहे त्यासाठी मनोज पाटील पात्र झाले आहेत, मनोज हे महाराष्ट्रातील पहिले खेळाडू आहेत जे या स्पर्धेसाठी Las Vegas येथे जाणार आहेत.त्यामुळे तमाम कोल्हापूर वासियांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे