कोल्हापूर दि 16:उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वारंवार शरद पवार यांची भेट घेत असल्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे.जर अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर शरद पवार यांनी एन डी ए मध्ये यायची अट प्रधानमंत्री मोदी यांनी घातल्याचे विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.त्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या या उधानामुळे चर्चाना उधाण आले आहे.त्यामुळे अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवार यांच्या भाजप सोबत न जाण्याच्या भूमिकेने खो बसत असल्याचे चित्र दिसत आहे की काय?असा प्रश्न निर्माण झाला आहे.