कोल्हापूर दि 14
15 ऑगस्ट म्हटलं की घरातील लहान पोरग सुद्धा मागतं
कोल्हापूर नगरी म्हणजे शाहू महाराजांची खवय्या नगरी…इथे छत्रपती शाहू महाराज काळात स्वातंत्र्य दिनाला जिलेबी खाण्याची प्रथा पडल्याची सांगण्यात येते.त्या अनुषंगाने कोल्हापूरच्या नगरीत एक सर्वसामान्य कुटुंबातील संजय नामक युवकाने या मिठाईचा ध्यास घेतला आणि तो कोल्हापूरकरांच्या चवीचा घास बनला…होय तोच ”संजय फरसाण” अगदी हालाकीत कष्ट करून या युवकाने करवीर नगरीचे नाव उज्जवल केले.संजय फरसाण म्हणजे ब्रँड अगदी कोकण पश्चिम महाराष्ट्र या भागातील नावाजलेले नाव.अजूनही संपूर्ण कुटुंब यामध्ये पत्नी मुलगा सून सर्वजण संजय फरसाण या ब्रँड ला साजेसे काम करत आहेत.मुलगा प्रतीक याने आधुनिक पणा जपत आजही जिलेबी म्हटले की आपसूकच जुना बुधवार येथील संजय फरसाण ही आत्मीयता जपली आहे.त्यामुळे हमखास जिलेबी साठी इथे पाय थांबतात.त्यामुळे कोल्हापूर करांची पसंती फक्त संजय फरसाण यात शंका नाही