कोल्हापुर दि 14:स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला बरेच नेते कार्यकर्ते आपले पक्ष बदलत असल्याचे दिसून येत आहे.तसेच कोल्हापुरात आधीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.त्यामुळे आपले राजकीय नशीब अजमावण्यासाठी “कोल्हापुरात यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविलेला हा उमेदवार आता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांच्या कडून मिळाली आहे.सदरचा उमेदवाराने मराठा क्रांती संघटनेमध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली असल्याचे समजते.ते आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह शिंदे गटात प्रवेश करून “फटाका” फोडणार असल्याचे दिसते.