कोल्हापूर दि 14:शनिवारी शिवसेनेच्या मेळाव्यात रविकिरण इंगवले यांचे नाव न घेता टीका. शनिवारी रवी इंगवले यांनी गांधी मैदान पाहणी दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुरामुळे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यातुन या मैदानासाठी निधी मंजूर केला. पण लोकांची वरात घाल माझ्या दारात अशा प्रवृत्तीचे लोक या कामाचे श्रेय घेऊन दिशाभूल करत आहेत अशा प्रकारचं वक्तव्य माजी नगरसेवक इंगवले यांनी केलं. याला प्रत्युत्तर देताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी इंगवले यांच्यावर घणाघात केलाय. यावेळी बोलताना सुजित चव्हाण म्हणाले की, अरे गांधी मैदान मधील कामाची शहानिशा कर आणि मग बोल. कोणी फंड आणलाय त्याची माहिती घे. झेंडा कोणाचा आणि नाचवतंय कोण? फंड आणण्यासाठी मनगटात दम लागतो आणि डोक्यात बुद्धिमत्ता लागते, तेव्हा कुठे फंड मिळतो. या लोकांना फक्त टक्केवारी आणि पाकीटची भाषा समजते. कोणावरही आरोप करताना आपण किती स्वच्छ आणि निर्मळ आहोत त्याचे पहिल्यांदा भान ठेवावे आणि बोलावे. परत व्यासपीठावर अथवा शिवसैनिकांवर अशा प्रकारचं कुठलंही भाष्य करताना विचार करून बोला, अन्यथा जशास तसे उत्तर द्यायला आम्ही सज्ज आहोत अशा प्रकारचा इशारा सुजित चव्हाण यांनी इंगवले यांचे नाव न घेता दिलाय.