सर्वप्रथम हुतात्मा गार्डन मध्ये आमदार जयश्री जाधव व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या शुभहस्ते स्वतंत्र सेनानी दत्तोबा तांबट व पहिले आमदार बराले पुतळ्याचे पूजन करण्यात आले यावेळी अनिल घाटगे म्हणाले
????????दीडशे वर्षाच्या जोखंडातून भारत देश आझाद करण्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे 9 ऑगस्ट 1942 होय महात्मा गांधींनी देशाला करेंगे या मरेंगे हा संदेश देण्याबरोबरच इंग्रजांना चले जाओ चा आदेश दिला आणि हा आदेश देत असताना याचे नेतृत्व संपूर्ण भारतातील जनता करेल असे सांगून रणशिंग फुंकले
इंग्रजाना या ठिणगीची चाहूल लागली आणि 9 ऑगस्ट क्रांती दिन पहाटे पाच वाजता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशातील सर्व प्रमुख नेते लोकांना स्थानबद्ध करण्यात आले मुंबईच्या बिर्ला हाऊस मधून महात्मा गांधींना अटक करण्यात आली परंतु महात्मा गांधींनी दिलेला संदेश शिरसावंद मानून हजारो लोकांनी देशाच्या कानाकोपऱ्यातून उठाव केला आणि इंग्रज सरकारची पळता भुई केली
हजारो लोकांनी करेंगे या मरेंगे या संदेशाला जागत इंग्रजांना चले जाव चा आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवून काहींनी प्राणाची आहुती दिली काहींनी प्रतिसरकारची स्थापना केली आणि इंग्रजांना सळोकी-पोळ करून सोडले सारा देश पेटून उठला आणि ही क्रांतीची ज्योत इतकी तीव्र झाली की कोणीच इंग्रजांच्या दडपशाहीला भीक न घालता ज्याने त्याने या क्रांतीच्या अंतिम टप्प्यात आपला सहभाग नोंदवला आणि याचीच परिमिती म्हणून 15 ऑगस्ट 1947 ला भारत देश स्वतंत्र झाला असे *प्रतिपादन 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने अनिल घाटगे यांनी व्यक्त केले यावेळी शहराच्या आमदार जयश्री जाधव यांनी आज सर्व स्वतंत्र सैनिकांचे स्मरण करण्याचा दिवस आणि अशावेळी आज या ठिकाणी थोर स्वतंत्र सेनानी दत्तोबा तांबट व कोल्हापूरचे पहिले आमदार बराले साहेब यांना वंदन करून हुतात्मा पार्क मध्ये सुरू असणाऱ्या कामाला गती देण्यात येईल आणि पुढच्या वेळेला या ठिकाणी अधिक सुविधेसह हुतात्मा गार्डन अद्यावत होईल असे सांगितले यावेळी कामाच्या प्रगती बाबत इंजिनियर सुरेश पाटील यांनी आमदारांना माहिती दिली यावेळी महापालिकेचे प्रभारी प्रशासक
अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त श्री केशव जाधव, शहर अभियंता श्री हर्षजीत घाटगे, उपयुक्त पाटील मॅडम, सहाय्यक आयुक्त श्री विजय पाटील सर्व उपशहर अभियंता श्री नारायण भोसले श्री सतीश पप्पी श्री सुरेश पाटील, पद्मल पाटील श्री प्रमोद बराले सतीश फप्पे विभागीय कार्यालयाचे शाखा अभियंता, तसेच कर्मचारी,परिसरातील जेष्ठ नागरिक, विद्यार्थी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका व प्रभाकर तांबट रवी तांबट महादेव पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी तांबट परिवाराचे सर्व मित्रमंडळी व नातलक उपस्थित होते आभार प्रभाकर तांबट यांनी मांडले
अनिल घाटगे
अध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ कोल्हापूर शहर जिल्हा