कोल्हापूर दि 9:1942 च्या लढ्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ गिरगाव येथून फिरगोंजी शिंदे स्मारकांपर्यंत हुतात्मा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कॅप्टन रघुनाथ पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. फिरगोजी शिंदे सारखा हुतात्मा होऊन गेले याचा आम्हाला अभिमान आहे असे गौरवोद्गगार कॅप्टन रघुनाथ शिंदे यांनी काढले.गिरगाव गावचे लोक नियुक्त सरपंच महादेव कांबळे यांनी शिंदे यांच्या धाडसी कार्याला उजाळा दिला.यावेळी बोलताना राहुल चौधरी म्हणाले फिरगोंजी शिंदे यांचे कार्य गिरगाव गावापुरता न राहता नवीन पिढीला फिरगोंजी शिंदे समजण्यासाठी आयटीआय, कळंबा रोड येथे त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. तसेच यासाठी लोकप्रतिनिधींकडे स्वतः पाठपुरावा करणार आहे असल्याचे चौधरी म्हणाले.चंद्रकांत कांडेकरी यांनी गिरगाव हे गाव क्रांतिकारक आहे हा वाचा तरुण पिढीने जपावा असे आव्हान केले यावेळी संभाजी ब्रिगेडची रुपेश पाटील कॅप्टन शशिकांत साळुंखे सरपंच महादेव कांबळे उपसरपंच उत्तम पाटील,बी के पाटील विद्यामंदिर शिक्षक मुख्याध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन संभाजी साळुंखे केलेया कार्यक्रमाचे नियोजन राहुल चौधरी निवास भोसले चंद्रकांत कांडेकरी शितल नलवडे सुजय कानकेकर सिद्देश भोसले बाळासाहेब देसाई आधी उपस्थित होते आभार बाळासाहेब देसाई यांनी मानले