दिनाक ०३:अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ६ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची कोल्हापूर आणि हातकणंगले रेल्वे स्थानकावर जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे, संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स तसेच माहिती तंत्रज्ञानं मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे आणि वस्त्रमंत्री दर्शना जरदोश व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सकाळी ९ वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी स्टेशन प्रकल्पांच्या व्हिडीओचे स्क्रिनिंग, शालेय मुलांना स्पर्धा पुरस्कार वितरण होणार आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत.