दिनांक२२: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार हिचा खून तिचाच मित्र राहुल हंडोरे याने केल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.
मृत दर्शना आणि राहुल लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते व त्यांची मैत्री होती.दर्शनच्या मामाचे घर आणि राहुलचे घर आमोरा समोर असल्याने त्यांची मैत्री होती.राहुल पुण्यात फूड डिलिव्हरी चे काम करून खोली भाड्याने घेऊन रहात होता.तोसुद्धा एम पी एस सी च्या परीक्षेची तयारी करत होता.त्याला दर्शना सोबत लग्न करायची ईच्छा होती.परंतु तो एम पी एस सी परीक्षा पास होत नव्हता म्हणून त्याने दर्शनाच्या घरच्यांच्याकडे थोडा वेळ मागितला होता की,तो सुद्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनेल. परंतु दर्शनाच्या घरच्यांनी दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरविण्याची तयारी केली असल्याची माहिती राहुलला होती.त्यामुळे तो अस्वस्थ होत होता.त्यामुळे त्याने दर्शना हिला ट्रेकिंग साठी राजगडाकडे नेऊन तिची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.त्यामुळे दर्शनाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.त्यामुळे इतक्या हुशार आणि कर्तृत्ववान असणाऱ्या मुलीचा एका अपयशी तरुणाने खून केला आहे.त्यामुळे सर्व स्तरातून संतापाची लाट निर्माण झाली आहे.तरी सदर घटनेबाबत राहुल हंडोरे दोषी असल्यास त्याला फाशी देण्याची मागणी होऊ लागली आहे