भन्नाट न्यूज नेटवर्क कोल्हापूर दि 13
आर टी ओ विभागा मार्फत महा मार्गावर चालकाची तैमासिक नेत्र व आरोग्य तपासणी ची यंत्रणा उभी रहाणी – संभाजी खराट – माहिती उप – संचालक कोल्हापूर – फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताह दरम्यान नव्हे तर महामार्गावर त्रैमासिक वाहन चालकाची नेत्र व आरोग्य तपासणी यंत्रणा आरटीओ विभागाने कार्यरत करावी आणि पायलेट प्रोजेक्ट म्हणून कोल्हापूर मधून प्रारंभ व्हावा ‘ अशी शुभेच्छापर विभागीय माहिती संचालक संभाजी खराट यांनी व्यक्त केली . कागल आर टी ओ चेक पोस्ट येथे वाहन चालक – कार्यालयीन कर्मचारी – स्थानिक ग्रामस्था चे डोळे तपासणी शिबिरात ते बोलत होते .
यावेळी फारूक बागवान – जिल्हा माहिती अधिकारी ,रोहित काटकरसहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सह विजयसिंह भोसले , विशाल बागडे , रोहन पांडकर , राहुल नलवडेउदय केंबळे , वैभव तोरणे सर्वमोटर वाहन निरीक्षक तसेच संतोष कुलकर्णी , डॉ .विरेद्र वणकुद्रे -श्री पंत वालावलकर हॉस्पीटल , ( शिवाजी उधमनगर कोल्हापूर ) आरोग्य मित्र – शिबीर समन्वयक राजेंद्र मकोटे , अशोक माने , राहूल माने आदि मान्यवर उपस्थित होते . प्रांरभी सर्वा चे स्वागत विजयसिंह भोसले यांनी केले . यावेळी बोलताना रोहित काटकर यांनी ‘ वाहन चालवणे ही फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे , या साठी व्यापक प्रबोधन व्हावे यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे असे आग्रही प्रतिपादन केले तर अरुण भगवान यांनी वाहन चालकांना एक व्यापक सामाजिक प्रतिष्ठान लाभली पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करत विविध सेलिब्रिटींच्या वाहनाला झालेली अपघात अलीकडच्या काळात अत्यंत चिंतने बनलेली आहे त्या साठी वाहन चालकावर येणारा अतिरिक्त याचाही अभ्यासू एक नियमावली तयार झाली पाहिजे असे मत व्यक्त केले तर संतोष कुलकर्णी यांनी समाजातील विविध घटका सह प्रशासकीय विविध जबाबदारी पार पाडणाऱ्या लोकांच्या आरोग्य तपासणी आणि इतर उपचारासाठी वालावलकर हॉस्पिटल नेहमीच तत्पर त्यांनी कार्यरत राहील असे आग्रहाने अभिवाचन दिले .यावेळी आरोग्यमित्र राजेंद्र मकोटे यांच्या यांनी संपादित केलेल्या आरोग्य दिनदर्शिका प्रती मान्यवरांना वितरीत करण्यात आल्या . सायंकाळपर्यंत झालेल्या या शिबिराचा लाभ विविध स्थानिक नागरिकां सह विविध प्रांतातून आलेल्या दिडशे हून अधिक वाहन चालक – त्यांचे सहाय्यक किन्नर यांनी घेतला . त्यांची नेत्र तपासणी करून नंबर काढून देत समुपदेशन हीं डॉ . विरेंद्र वणकुद्रे यांनी साय्यहिका मनिषा रोटे समावेत केले . आगामी काळात अशी शिबिरे नियमित आयोजित करावीत अशी आग्रही मागणी शिबीरार्थीनी केली