भन्नाट न्यूज-आवाज महाराष्ट्राचा
कोल्हापूर, दि.27(जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्त्याखाली सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात आजी-माजी सैनिकांच्या शिक्षण घेणाऱ्या पाल्यासाठी सैनिक मुला-मुलींची वसतीगृहे चालवली जातात. सद्यस्थितीत वारंवार होणाऱ्या महागाईचा विचार करता महाराष्ट्र शासनाने भोजन व निवास शुल्कात दिनांक 1 जानेवारी 2023 पासुन वाढ करण्याचे विचारधीन होते.
तथापी आजी- माजी सैनिक यांचेकडुन प्राप्त झालेल्या सुचना/ विनंतीवरुन तसेच माजी सैनिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र शासनाकडुन करण्यात आलेली सदर दरवाढ अंशत: मागे घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.