आज कागल मध्ये एक नवीन प्रकार घडला आहे चक्क मतदान यादीतून च उमेदवाराचे झाले नाव गायब,
उत्तूर येथील सामाजिक कार्यकर्ते श्री अश्विन भुजंग हे कागल विधानसभा मतदार संघाततुन अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागल तहसील कार्यालय येथे गेले असता त्यांच्या कागपात्राची पाहणी करत असताना तेथील अधिकारी यांनी आपले नाव मतदान यादी मधून काढण्यात आले आहे असे सांगण्यात आले हे ऐकताच खासदारकिला मी मतदान केले आहे आणि एका महिण्यात यादीतून नाव गायब कसे झाले या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी तहसीलदार यांच्याकडे अश्विन भुजंग समर्थक यांनी मागणी केली
गेले दोन महिने कागल विधानसभा लढवण्यासाठी तयारी करत असलेले श्री अश्विन भुजंग हे निवडणूक लढवण्या पासून वंचित राहणार कि काय? असे वाटत आहे सामान्य नागरिकांनी आपल्या हक्कासाठी निवडणूक लढावायची कि नाही यातून येत्या काळात एक नवे चेहरे दिसतील कि वंश परंपरागत लढवणारे नेत्यांची मुलेच निवडणूक लढविणार कि काय असे अश्विन भुजंग समर्थकांच्या तुनच उठलेला आवाज आहे