भाजपा सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार (दादा) व राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना.सुनिल तटकरेसाहेब यांनी निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांचे स्वागत केले व २८३ इस्लामपुर विधानसभा मतदार संघातुन उमेदवारी जाहीर केली.यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचा अधिकृत एबी फाॅर्म ना.अजित पवार (दादा) यांच्या हस्ते निशिकांत भोसले- पाटील (दादा) यांना देण्यात आला,यावेळी या क्षणापासुन इस्लामपुर विधानसभा मतदार संघाच्या सार्वगिण विकासासाठी,जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण शक्ती निशिकांतदादांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे ना.अजित पवार (दादा) यांनी सांगितले,यावेळी आ.सदाभाऊ खोत,आ.इद्रिसभाई नायकवडी,प्रा.प्रभाकर जमदाडेसर,वाळवा तालुका राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष केदार पाटील,इंजि.विरेंद्र राजमाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी जिल्हा परीषद सदस्य पै.भिमराव माने,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे,युवा मोर्चाचे उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपाचे सरचिटणीस संदीप सावंत,दादासाहेब रसाळ,इस्लामपुर शहर भाजपाचे उपाध्यक्ष भास्कर मोरे,सयाजी जाधव,युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील आदि भाजपा पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी भाजपा चे प्रदेश सदस्य प्रसाद पाटील,भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील,भाजपा वाळवा तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रविण परीट,आष्टा नगरपालिकेचे माजी नगरसेवक मयुर धनवडे,मनोज मगदुम,भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत,सरचिटणीस प्रविण परीट,समीर मुल्ला,अक्षय पाटील,फिरोज मगदुम,रणजीत माने,विश्वजीत पाटील आदिसह अन्य पदाधिकारी उपस्थीत होते.