विजयाचा जयघोष, वाद्यांचा गजर, जमलेला प्रचंड जनसागर आणि ज्येष्ठ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे म्हणजे महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांनी गुरुवारी आपला उमेदवार अर्ज दाखल केला.
इचलकरंजी विधानसभा मतदार संघात महायुती च्या वतीने भारतीय जनता पार्टी तर्फे राहुल आवाडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन करत गुरुवारी राहुल आवाडे यांनी गुरुपुष्यामृतचा मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. झेंडे, स्कार्फ आणि टोप्या यामुळे संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती. विविध वाद्यांचा गजर आणि प्रचंड जय घोषामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, समन्वयक अशोक स्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, श्रीनिवास कांबळे आदिसह महायुतीतील घटक पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू झालेली रॅली मुख्य मार्गाने शिवतीर्थ या ठिकाणी आल्यानंतर राहुल आवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रांत कार्यालय येथे आल्यानंतर प्रमुख मान्यवरांसह राहुल आवाडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रकाश दतवाडे, प्रकाश मोरे, तानाजी पोवार, भाजपा शहराध्यक्ष पै. अमृत भोसले, जयेश बुगड, अनिल डाळ्या, जयेश बुगड, प्रसाद खोबरे, संकेश्वरी आवाडे, मौश्मी आवाडे, अश्विनी कुबडगे, उर्मिला गायकवाड आदिसंह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व आवाडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.