कोल्हापूर दि. 23 : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराज साहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर कोल्हापूर व हातकणंगले लोकसभेसाठी समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आलेले मनसे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर काल कोल्हापूर दौऱ्यावर आले होते.
काल दुपारी इंजीनियरिंग हॉल, उद्यम नगर येथे कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी सर्व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या जोमाने कामाला लागावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. मा खा संजय मंडलिक व मा खा धैर्यशील माने या दोघांनीही संपर्क साधून राज साहेबांची सभा कोल्हापूरमध्ये घेणे विषयी विनंती केलेली आहे याबाबत राज साहेबांशी चर्चा करून निर्णय कळविण्यात येईल असेही पदाधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी मनसे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी विशद केले की, महायुतीच्या सर्व नेत्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांचा यथोचित मान सन्मान ठेवण्याची गरज असून सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रचारामध्ये जोमाने गती देण्यासाठी सहभागी होऊन दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, गजानन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, अमित पाटील, राजू पाटील, रोहन निर्मळ, राजेंद्र चव्हाण, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, यतीन होरणे, तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, अशोक पाटील, विजय करजगार, राजू यादव, तालुका उपाध्यक्ष अरविंद कांबळे, संदीप खाडे, शहर उपाध्यक्ष सुनील तुपे, उत्तम वंदुरे, राजन हुल्लोळी, राहूल पाटील इत्यादी मुख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.