कोल्हापूर दि १०- गुढीपाडव्याच्या मेळाव्यानंतर मनसेला धक्का बसला असून मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमर शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय न पटल्याने किर्तीकुमार राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अजून काही राजीनामा नाट्य पाहायला मिळणार का याची उत्सुकता जनतेमध्ये वाढल्याचे दिसून येत आहे.