कोल्हापूर दि 5 सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व दुकानांवरती मराठी फलक लावण्याच्या आदेशाचा भंग करणाऱ्या कोल्हापुरातील व्यापाऱ्यांना मा. राजसाहेबांच्या आदेशाने कोल्हापूर लोकसभा संघटक बाळा शेडगे व संपर्काध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे आज मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करून चांगला धडा शिकवण्यात आला.
मनसे कोल्हापूरचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमकतेने रस्त्यावरती उतरून इंग्रजी बोर्डांची तोडफोड करून त्यांना काळे फासण्यात आले.
पुढील दोन दिवसात व्यापाऱ्यांनी जर का दुकानावरील इंग्रजी पाट्या बदलून जर मराठी लावल्या नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मराठी बोर्ड न लावणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना ठणकावून सांगितले.
शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले व जिल्हा सचिव प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा , विभाग प्रमुख सागर साळोखे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत , शहर सचिव निलेश आजगावकर , उत्तम वंदुरे , चंद्रकांत सुकते , दिलीप पाटील , यतीन हुरणे, अरविंद कांबळे, अमित बंगे, अमित साळोखे, गणेश लाखे , राहुल पाटील , शरद जाधव, अमर कंदले , विक्रम नरके , अजिंक्य शिंदे, सॅम मुधाळे , मोहसीन मुलानी, अजिंक्य कांबळे, नवनाथ निकम, गणेश शिंदे, निलेश पाटील , प्रशांत माळी इत्यादी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला.