कोल्हापूर दि 18
आज आखरी रास्ता कृती समितीच्या वतीने शहरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा बंद करून भोंगळ कारभार मागे घेण्याबाबत महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले.कोल्हापूर महानगरपालिकेने बालिंगा पम्पिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या ठिकाणी एक दिवस आड पाणीपुरवठा नियोजन केले आहे.ते अत्यन्त अव्यवहार्य असून ते त्वरित मागे घ्यावे असे म्हटले आहे.तसेच राधानगरी धरणात पुरेसा पाणीपुरवठा असून सुद्धा बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये पाणी कमी पडण्याचे काहीच कारण नसल्याचे देखील कृती समितीने म्हटले आहे.गळतीत हजारो लिटर वाया जाणाऱ्या पाण्याकडे लक्ष देऊन सणासुदीला सर्वसामान्य नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.यावर आयुक्त के मंजू लक्ष्मी यांनी तांत्रिक बाबी तपासून यावर त्वरित निर्णय घेऊ असे आश्वासन दिले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी समन्वयक किशोर घाटगे,राजू तोरसकर ,ओंकार शिंदे,रियाज बागवान,कपिल नाळे आदी उपस्थित होते.