कोल्हापूर दि.०४ : मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.मा.श्री.अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सर्वांगीण विकासाच्या वाटेवर आहे. महायुती शासनाकडून गेले वर्ष भरात अनेक जनहिताचे निर्णय घेवून आपली कार्यतत्परता दाखवून दिली आहे. आजच कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्री पदावर जिल्ह्यातील अनुभवी नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.मा.श्री.हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली असून, नवनियुक्त पालकमंत्री ना.मा.श्री.हसन मुश्रीफ यांचे हार्दिक अभिनंदन.. नूतन पालकमंत्री ना.मा.श्री.हसन मुश्रीफ यांच्या अनुभवाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चितच फायदा होणार असून, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास ताकत मिळणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हंटले आहे कि, नूतन पालकमंत्री ना.मा.श्री.हसन मुश्रीफ यांनी यापूर्वीही राज्य मंत्रिमंडळामध्ये विविध मंत्री पदांवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांचा अनुभव पाहता त्यांची यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होणे अपेक्षित होते. परंतु, काही ना काही कारणास्तव ते पालकमंत्री पदी विराजमान होवू शकले नाहीत. त्यांच्या अनुभवाचा कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच फायदा होणार आहे. आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा करू. पालकमंत्री ना.मा.श्री.हसन मुश्रीफ ही कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाची सुनिश्चित दिशा ठरवून कार्य करतील, यात काडीमात्र शंका नाही. त्यांना या निवडीबद्दल हार्दिक शुभेच्छा..
त्याचबरोबर माजी पालकमंत्री तसेच राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.मा.श्री.दिपक केसरकर यांचेही आभार.. कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ना.मा.श्री.केसरकर यांनी चांगल्याप्रकारे सांभाळली आहे. कोल्हापूर जिल्ह्यास त्यांनी झुकते माप दिले आहे. ना.मा.श्री.दिपक केसरकर यांच्या वर्षभराच्या कार्यकिर्दीत जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविले. संस्थान कालीन दसरा महोत्सवास त्यांनी लोकोत्सवाचे स्वरूप देवून कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाची ख्याती दूरवर पसरविली. यासह विविध विकास कामांसाठी निधीची तरतूद केली. त्यांचीही कारकीर्द कोल्हापूरवासीय सदैव आठवणीत ठेवतील, अशा शुभेच्छा पत्रकाद्वारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत.