कोल्हापूर – प्रतिमा विद्या प्रतिष्ठानच्या वतीने आर के नगर येथील मैदानावर सुरू असलेल्या दशलक्षण महापर्वा मध्ये एप्पल हॉस्पिटलच्या वतीने भव्य आरोग्य शिबिर संपन्न झाले . याचा लाभ चारशेहून अधिक श्रावक श्रविकानी त्यांचा लाभ घेतला . अपल च्या व्यवस्थापिका गीता आवटी यांच्या समन्वयाने या शिबीरात डॉक्टर प्रीतम देसाई डॉक्टर – गिरीश कोरे सह सहायक नितीन पोतदार – इरफान अत्तार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून गरजेनुसार त्यांना तीन ते दहा दिवसाची औषधे दिली . या आरोग्य शिबीरा बद्दल गीता आवटी यांचा श्रीफळ – स्मृतिचिन्ह देवून संयोजक अध्यक्ष विजय पाटील – उपाध्यक्ष सुरेश भोजकर – कार्याध्यक्ष अमर मार्ले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला . आज सकाळ च्या सत्रात प पू मुनी श्री नियम सागर जी महाराज यांच्यासह पवित्र सागर जी महाराज , वृषभसागरजी महाराज , अभिनंदन सागरजी महाराज , सुपार्श्व सागरजी महाराज , प पू गणनी श्रुतमती माताजी , समतामती माताजी , शुल्लक संयमसागर जी च्या पवित्र वाणीच्या प्रवचनातून सर्वजण अंतर्मुख केले . त्यांनी क्षमा – मार्दव – आर्जव – शौच – सत्य – संयम – तप – त्याग – आकिंचन्य – ब्रम्हचार्य या दशलक्षणा विविध पैलू नी त्यागी – व्यासंगी मुनीजन आपल्या अधिकार वाणी दारे विवेचन केले . या भव्य कार्यक्रमासाठी प्रतिमा विद्या प्रतिष्ठान गेली तीन महिन्यांमध्ये अधिक काळ अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष सुरेश भोजकर, सचिव सुनील साजणे , खजानीय सचिन बहिर शेठ , कार्याध्यक्ष अमर मार्ले – ए बी कामते – राजु शेठे , सचिन मिठारी, विशाल मिठारी, भूषण कावळे, वैभव कोगनुळे ,अमोल घोडके, अशोक बहिर शेठ, अवनीश जैन, सतीश पत्रावळे अनुपम भोजकर , अरुण तीर्थ, अमित बागे, सचिन पाटील, संजय टेंभुर्ले, यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्या समावेत कार्यरत आहेत . मंगळवारी येथे महत्वपूर्ण आचार्य भक्ती चे आयोजन करण्यात आले आहे यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील,आमदार रुतुराज पाटील आणि परिवारातर्फे त्या दिवसाचे संपूर्ण आहार दान केले आहे व उपस्थिती आसणार आहेत .या सोहळ्याची सांगता रविवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजता शहरातील दसरा चौक येथून प्रांरभ होणार आहे या सर्व सोहळ्यात पंचक्रोशीतील सर्व भक्तगण श्रावण सविता यांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रतिमा विद्या प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे .