कोल्हापूर दि 25
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पक्षाच्या विरुद्ध बातम्या लागू नयेत म्हणून पत्रकारांना चहा प्यायला न्या अथवा ढाब्यावर जेवायला न्या असे अवमानकारक वक्तव्य केले आहे.त्यामुळे पत्रकार बांधवांच्यात संतापाची लाट उसळली आहे.बावनकुळेच्या या वक्तव्याची किंमत त्यांना भविष्यात मोजावी लागेल.त्यामुळे बावनकुळे सतेसाठी “खुळे” झालेत की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.काही दिवसांत त्यांचा कोल्हापूर दौरा असल्याने या दौऱ्यात त्याचे पडसाद उमटणार आहेत.पत्रकारांच्या बाबत असे वक्तव्य करून बावनकुळे नी विनाकारण समाजातील वातावरण बिघडविले आहे.त्यांच्या या वक्तव्यातून भाजप चे नेते किती खालच्या थराला जात आहेत याची जाणीव होताना दिसत आहे प्रदेशाध्यक्ष यांचे वाक्य म्हणजे पक्षाचे वाक्य असे गृहीत धरले जाते,मग भाजप पक्ष म्हणून याबाबत काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.