कोल्हापूर दि 22
संपूर्ण जगभरात आजच्या दिवशी ऍपल कंपनीचा नवीन आय फोन 15 लॉन्च करण्यात येत आहे.त्याप्रमाणे कोल्हापुत येथील एस एस मोबाइल येथे आय फोन 15 चा फोन लॉन्च करण्यात आला. सदर फोन लॉंचिंग वेळी आमदार सतेज पाटील,घाटगे ग्रुपचे तेज घाटगे,झंवर ग्रुप चे नीरज झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात बँक ऑफ न्यूयॉर्क च्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पहिला फोन कु सोनिया रुकडे यांना प्रदान करण्यात आला.सदर फोनची खरेदी हौशी लोक करत आहेत.खास करून युवा वर्गाकडून या फोनला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.