कोल्हापूर – – कोल्हापूर ते दिल्ली धावण्याचा विक्रम करणारे आणि आयुष्यभर रक्तदान प्रसार प्रसिद्धी प्रचार यासाठी कार्यरत असलेले, प्रदीर्घकाळ राजर्षि शाहू ब्लड बँकेत सेवा दिलेले रक्तमित्र अनिल बापूसो कानकेकर ( वय 62 – रा . म्हाडा कॉलनी कळंबा ) यांचे सीपीआर रुग्णालयात निधन झाले .गेली दोन वर्षे ते अर्धांग वायू आजाराने प्रकृतीची झुंज देत होते .त्यांच्यामागे दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे रक्षाविसर्जन रविवारी दि १७ रोजी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशान भूमीत होणार आहे .