कोल्हापूर दि 16:मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली 11 वर्षे चालू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी निर्धार मेळाव्या मध्ये राज ठाकरे यांनी भाजप वर हल्लाबोल केला आहे.मनसे ने टोल फोडल्याच्या कारणावरून भाजपने आधी रस्ते बांधायला शिका मग टोल फोडा असा टोला लगावला होता.त्यावर राज ठाकरे यांनी आज या मेळाव्यात भाजपला आधी आपला पक्ष वाढवायला शिका मग दुसऱ्यांचे पक्ष फोडा असा घणाघात केला आहे.दुसऱ्याला कारवाईची भीती दाखवून एकेकाला आत घ्यायचे आणि मग त्यांनी गाडीत झोपून जायचे आणि वर म्हणायचे मी नव्हतो,असा उपरोधिक टोला अजितदादा यांना उद्देशून केला असल्याचे दिसते.त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि मनसे सामना रंगत असल्याचे चित्र आहे.