कोल्हापुर ०४ ; सध्या नवी दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात खासदार धनंजय महाडिक यांनी नागरिकांच्या आरोग्य विषयक योजनांबाबत महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित केला. सार्वजनिक आरोग्य रक्षणासाठी केंद्र सरकारकडून जाणीवपूर्वक पावले उचलली जात आहेत. कोरोना काळात केंद्र सरकारचे कर्मचारी, निवृत्त कर्मचारी यांनाही आरोग्य विषयक अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पुणे येथे केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र आहे. मात्र कोल्हापुरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना, पुण्यात जाऊन आरोग्य विषयक सुविधा घेणे शक्य होत नाही. त्यामुळे कोल्हापुरात केंद्र सरकारचे आरोग्य केंद्र सुरू होणे आवश्यक आहे. त्याचा उपयोग कोल्हापूर शहर आणि अकरा तालुक्य सुमारे एक लाख पेक्षा अधिक कर्मचारी आणि निवृत्त कर्मचारी यांना होऊ शकेल. शिवाय सैन्यातील जवान, माजी सैनिक यांच्या आरोग्यासाठी केंद्रीय आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर कोल्हापुरात cghs वेलनेस सेंटर म्हणजेच केंदिय आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी राज्यसभेत बोलताना केली. त्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.