कोल्हापूर दि :1 -हिंगोली जिल्ह्याचे भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर अज्ञाताने गोळीबार केला असून ते गंभीरपणे जखमी झाले आहेत.पप्पू चव्हाण हे आज दुपारी 1 च्या दरम्यान हिंगोली जिल्हा परिषदे मध्ये कामानिमित्त गेले होते.तिथून बाहेर पडताना पाठीमागील बाजूने हल्लेखोराने गोळीबार केल्याचे सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसत आहे.तरी पप्पू चव्हाण यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदरचा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ठ झाले नाही.