कोल्हापूर दि 22
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री दीड वाजता कुटुंबासह दिल्लीत दाखल झाले असून आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.मुख्यमंत्री अचानकपणे दिल्लीला भेटीस जाण्याचे कारण अजून समजले नसल्याने राज्यात चर्चाना उधाण आले आहे.तसेच येणाऱ्या काळात काही महत्वाचे बदल होणार असल्याचे संकेत या भेटीमागे नसतील ना? अश्या चर्चा होऊ लागल्या आहेत.त्यातच आज उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकू लागल्याने सर्वजण संभ्रमात असल्याचे चित्र आहे.