दि 21: बॉलिवूड अभिनेता नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट प्रतिभा आहेत. गेल्या 5 दशकांपासून त्यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचं नाव अशा कलाकारांमध्ये घेतलं जातं, ज्यांनी मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाच्या जोरावर लोकांची मने जिंकली.आपल्या दमदार अभिनयाने अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन यांचा जन्म 20 जुलै 1950 साली एका नवाब कुटुंबात झाला.ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मनोरंजन क्षेत्राचा भाग आहेत. 1967 साली आलेल्या “अमन” चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.नसीरुद्दीन शाह एक उल्लेखनीय अभिनेते आहेत. ज्यांना आतापर्यंत 3 राष्ट्रीय पुरस्कार आणि 3 फिल्मफेअर पुरस्कारांसह पद्मभूषण आणि पद्मश्री सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.जाने भी दो यारो (1983) जाने भी दो यारो हा सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे जिथे नसीरुद्दीन शाहने आपल्या विनोदी भूमिकेने सर्वांची मने जिंकली. विनोद (नसीरुद्दीन शाह) आणि सुधीर (रवी बसवानी) या दोन पात्रांभोवती या चित्रपटाची कथा फिरते.या चित्रपटातीस शाहच्या अभिनयाने लोकांची मने जिंकली होती.