दि 18:चांद्रयान-3 चे अवशेष ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर पडल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर रहस्यमय वस्तू आढळल्याने या चर्चांना उधाण आलं आहे.भारताने अलिकडेच चांद्रयान-3 मोहिमेचं यशस्वीरित्या प्रक्षेपण केलं. इस्रोच्या चांद्रयान-3 च अवशेष ऑस्ट्रेलियाच्या (Australia) समुद्र किनाऱ्यावर आढळल्याची चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर रहस्यमय वस्तू आढळली आहे. या रहस्यमयी वस्तूचा इस्रोच्या चांद्रयान-3 सोबत संबंध असल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या वस्तूची तपासणी करत आहे. काहींनी दावा केला आहे की, हे अवशेष भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील एक भाग असू शकतो.