कोल्हापूर दि 18:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. मेळाव्यानंतर एकनाथ शिंदे करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी पोहोचले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते.एकनाथ शिंदे यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दीपक केसरकर होते.तसेच खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकरही उपस्थित होते.मेळाव्यातून बोलताना शिंदे यांनी पक्षवाढीचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.