कोल्हापूर दि 13-पोलीस मुख्यालयात कार्यरत असणाऱ्या काजल गणेश लोंढे रा. बंगला नं.10,पार्वती कन्स्ट्रक्शन, सरनोबतवाडी, पसरीचा नगर ता. करवीर जि कोल्हापूर-नेमणूक महिला सहाय्य कक्ष,पोलीस अधीक्षक कार्यालय वर्ग-3 या महिला कॉन्स्टेबल ला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार यांनी त्यांचे घरगुती कारणावरून त्यांचे पत्नीच्या विरूद्ध महिला सहाय्य कक्ष पो.अ. कार्यालय कोल्हापूर येथे अर्ज दिलेला होता सदर अर्ज निकाली काढला व निकाली काढलेल्या अर्जाचे समजपत्र तक्रारदार यांना देणेकामी आरोपी नं.1 यांनी तक्रारदार यांचेकडे 2000 रुपये लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम तक्रारदार यांचेकडून स्वीकारल्याने त्याना रंगेहाथ पकडण्यात आले त्यानंतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.