कोल्हापूर दि: 25
गेली 40 वर्षे नरसिंह मंदिर ते गंगाई लॉन या रस्त्यावरून खाच खळग्याच्या आणि पावसात अक्षरशः चिखलातून प्रवास करावा लागत होता.अखेर राज्य नियोजन चे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आणि शिवसेना उप शहर प्रमुख सुरेश माने यांच्या पाठपुराव्याने या रस्त्याचे डांबरीकरण झाले असून नागरिकांतून समाधान व्यक्त होऊन या कामात सहकार्य केलेल्या सर्वांचा नागरी सत्कार गंगाई लॉन येथे पार पडला.
खरंतर ज्यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते तेव्हा त्यांनी घेतलेल्या जनता दरबारात सुरेश माने यांनी निवेदन देऊन मागणी केली होती.त्यावेळी राजेश क्षीरसागर यांनी सदर रस्त्यासाठी तात्काळ निधी मिळावा म्हणून खासदार शिंदे यांना विनंती केली. त्यामुळे खासदार शिंदे यांनी 15 दिवसात रस्त्याचे काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते. त्यांनतर 15 व्या दिवशी कामाला सुरुवात सुद्धा झाली आणि काम पूर्ण झाले.यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रशांत साळोखे, रविकांत अडसूळ,आयुक्त, हर्षजीत घाटगे,एन एस पाटील,अवधूत नेर्लेकर या सर्व अभियंत्यांचा व कॉन्ट्रॅकटर उदय पाटील यांचा सुद्धा नागरी सत्कार करण्यात आला.यावेळी पुष्कराज क्षीरसागर व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.